28 ऑक्टोबर रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण व रोजगारासाठीचा भरती मेळावा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२१ | सातारा | मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आय.टी.आय. मोळाचा ओढा सातारा येथे गुरुवार  दि. 28 ऑक्टोबर 2021 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनी पनवेल तर्फे प्रशिक्षण  व रोजगारासाठीचा भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

18 वर्ष पूर्ण असलेले आयटीआय वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन , सुतारकाम इ. पास-नापास किंवा 5 वी पास किंवा शिक्षण पूर्ण न झालेले बेरोजगार युवकांसाठी मोफत प्रशिक्षणाची लार्सन अँड टुब्रोच्या कन्स्ट्रक्शन स्किल इंन्स्टिट्यूट पनवेल येथे व्यवस्था करण्यात येणार आहे. बांधकामाशी संबंधित इलेक्ट्रिकल, वायरमन वेल्डिंग, सुतारकाम, गवंडी, बारबेंडिन्स व स्टील कामविषयक व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.  प्रशिक्षण दरम्यान राहण्याची, जेवणाची, प्रवासभाडेची सोय कंपनी मार्फत मोफत केली जाणार आहे. उमेदवारांना गणवेश, सेफ्टीबुट, सुरक्षा साधने दिली जाणार आहेत. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर यशस्वी उमेदवारास प्रमाणपत्र दिले जाणार असून कंपनी मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.

इच्छुक उमेदवारांनी शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, रेशनकार्ड, विजबिल,  आधारकार्ड, फोटो व बँक पासबूक च्या तीन प्रतीसह दि. 28 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता शासकीय आय. टी. आय . मोळाचा ओढा सातारा येथे उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य एस. एम. धुमाळ यांनी केले आहे. अधिक माहिती साठी मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र द्वारा शासकीय आय.टी.आय. मोळाचा ओढा सातारा येथे संपर्क साधावा.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!