सोनवडी खुर्द येथे उद्यानकन्यांचे स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२४ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणच्या सातव्या सत्रातील उद्यानकन्या प्रशिक्षणासाठी सोनवडी खुर्द, ता. फलटण, जि. सातारा येथे दाखल झाले असून सोनवडी खुर्द ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी या उद्यानकन्या विद्यार्थिनींचे उत्स्फूर्त स्वागत केले.

ग्रामीण उद्यानविदया कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सुमारे २० आठवडे येथे वास्तव्यास राहणार असलेले ह्या विद्यार्थिनी शेतकर्‍यांना शेतीविषयक माहिती, नवीन तंत्रज्ञान याबाबत माहिती देऊन गावामध्ये शेतीविषयक विविध उपक्रम व कार्यक्रम राबविणार आहेत. माती परीक्षण, फळबाग लागवड, एकात्मिक कीड रोग, बीज प्रक्रिया, आधुनिक शेती औजारांचा वापर, शेतीचा आर्थिक फायदा, जनावरांचे लसीकरण आदींबाबत उपस्थित गावकरी व शेतकर्‍यांशी संवाद साधणार असल्याचे या उद्यानकन्यांनी सांगितले.

उद्यानविद्या विषयक जनजागृती करण्यास उद्यानविदया कार्यानुभव यांचा अभ्यास उद्यानकन्या करणार आहेत. खराडे वर्षा, माळी अस्मिता, गोसावी क्रांती, गलांडे शिवानी, काशीद अमृता, शिंदे स्नेहल ह्या उद्यानकन्या येथे दाखल झाल्या आहेत. त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन सरपंच श्रीमती सूर्यवंशी शालन , उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी यावेळी दिले.

उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण, कार्यक्रम अधिकारी प्रा. जे. व्ही. लेंभे व प्रा. ए. डी. पाटील यांचे मार्गदर्शन या विद्यार्थिनींना लाभणार आहे.


Back to top button
Don`t copy text!