RBI ची MPC बैठक:रिझर्व्ह बँकने महागाई लक्षात घेत रेपो रेट 4% ठेवला, बँक दरामध्ये कोणताही बदल नाही

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दि.४: महागाई लक्षात घेऊन आरबीआय
समितीने धोरणात्मक दरात बदल केला नाही, तो 4% आहे. रिझर्व्ह बँकेचे
गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी शुक्रवारी 3 दिवसीय समितीच्या बैठकीनंतर
सांगितले की – महागाई अजूनही उच्च पातळीवर राहील याची भीती व्यक्त केली जात
आहे. दरम्यान, हिवाळ्यात यामध्ये थोडा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

ते
म्हणाले की महागाईचा दर उंच असल्यामुळे पुरवठा साखळीत अडचण आहे. रेपो दरात
कोणताही बदल होणार नाही, असा अंदाज तज्ञांनी पूर्वी व्यक्त केला होता.
निकालानंतर रेपो दर 4%, रिव्हर्स रेपो दर 3.35%, कैश रिजर्व्ह रेशियो 3%
आणि बँक दर 4.25% च्या स्तरावर राहील.

किरकोळ महागाई 6.8% राहू शकते

गव्हर्नर
शक्तीकांत दास म्हणाले – आर्थिक वर्ष 2020-21 च्या तिसर्‍या तिमाहीत
किरकोळ महागाई 6.8%, चौथ्या तिमाहीत 5.8% राहण्याचा अंदाज आहे. RBI ने
आधीच्या ऑक्टोबरच्या पतधोरणामध्ये असा अंदाज व्यक्त केला होता की 2020-21
मध्ये देशातील जीडीपी 9.5% ने कमी होऊ शकतो. तिसऱ्या तिमाहीत ते 5.6% ने
कमी होण्याचा अंदाज होता. त्याच वेळी, चौथ्या तिमाहीत जीडीपीमध्ये अर्ध्या
टक्क्याने वाढ होण्याचा अंदाज होता.

CPI दर अंदाजे 6.8% राहण्याचा अंदाज

तिसर्‍या
तिमाहीत ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) चा महागाई दर 6.8% वर राहण्याचा
अंदाज आहे. वास्तविक GDP ग्रोथ रेट आर्थिक वर्ष 2021 मध्ये -7.5% राहण्याचा
अंदाज आहे. गव्हर्नर म्हणाले की आर्थिक बाजारपेठ चांगली कामगिरी करत आहे.
गावाच्या मागणीत रिकव्हरीमध्ये मजबूतीचा अंदाज आहे. हे भविष्यातही सुरूच
राहील. सिस्टममध्ये तरलता टिकवण्यासाठी आपण योग्य वेळी सर्व साधनांचा वापर
करू.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!