रॅपीडो टू व्हीलर टॅक्सी सेवा बंद करण्याची मागणी; ३० नोव्हेंबरला निवेदन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण तालुक्यात सुरू असलेल्या रॅपीडो टू व्हीलर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करावी, अन्यथा रिक्षा बंदचा इशारा देणारे निवेदन ३० नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता देण्यात येणार आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 28 नोव्हेंबर : फलटण तालुक्यात सुरू असलेल्या रॅपीडो टू व्हीलर टॅक्सी सेवा तात्काळ बंद करण्यात यावी आणि न्याय न मिळाल्यास रिक्षा बंद करण्याबाबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, फलटण शहर पोलिस स्टेशन, ग्रामीण पोलिस स्टेशन, तहसीलदार फलटण व प्रांताधिकारी फलटण यांना सोमवार, दि. 30 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी चार वाजता निवेदन देण्यात येणार आहे.

रिक्षा चालक-मालकांची बैठक व मागण्या

माळजाई मंदिर येथे फलटण शहरातील सर्व रिक्षा चालक-मालक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी फलटण शहरातील रिक्षा चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीमध्ये बेकायदेशीरपणे फलटण शहरात चालू असलेल्या बाईक रॅपीडो व्यवसायामुळे कायदेशीर परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्या रिक्षा चालकांवर होत असलेला अन्याय, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला.

आरटीओ कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन

न्याय न मिळाल्यास रिक्षा बंद करण्याबाबतचे निवेदन देण्यासाठी फलटण शहरातील सर्व रिक्षा चालक-मालक यांनी आरटीओ कार्यालय फलटण येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!