स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार, ठाण्यात 19 वर्षीय तरुणावर गुन्हा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
February 14, 2021
in मुंबई - पुणे - ठाणे
ADVERTISEMENT

स्थैर्य,ठाणे,दि.१४: धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये मैत्रीणीवर बलात्कार केल्याप्रकरणी 19 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्हॅलेंटाईन्स डेच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शनिवारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी ठाणे पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. (Thane Cops Book 19 Years Old Boy for allegedly Raping Girl in Train Toilet)

आरोपी तरुण आणि पीडित तरुणी दोघेही गोरखपूर एक्स्प्रेसने एकत्र प्रवास करत होते. यावेळी तरुणाने पीडितेला स्वच्छतागृहात नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, असा आोप केला जात आहे. बुधवारी सकाळी सात वाजता ही घटना घडल्याचा आरोप बलात्कार पीडितेने केला आहे.

तरुणीच्या तक्रारीवरुन मुंबईतील कुरार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर तो ठाणे रेल्वे पोलिसात वर्ग करण्यात आला. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून अद्याप कोणालाही अटक झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पाच महिन्यात 17 जणांचा बलात्कार

अल्पवयीन तरुणीवर पाच महिन्यांच्या कालावधीत तब्बल 17 जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी कर्नाटकात उघडकीस आला होता. विशेष म्हणजे मुलीची मावशीच या प्रकरणात मुख्य आरोपी असल्याचं समोर आलं. पीडितेचे फोटो, व्हिडीओ काढून ब्लॅकमेलिंगनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचाराची मालिका सुरु झाली होती.

कर्नाटकातील चिकमंगळुरु जिल्हा बालकल्याण समितीच्या सभापतींनी 30 जानेवारीला 17 जणांविरोधात बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार 15 वर्षांच्या मुलीवर पाच महिने 17 जणांकडून बलात्कार आणि लैंगिक अत्याचार करण्यात आले.

बसचालकाशी ओळख, मित्रांकडून अत्याचार

पीडित तरुण दगड फोडणाऱ्या कंपनीत काम करत असताना तिची ओळख गिरीश नावाच्या बस चालकासोबत झाली. त्याने तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केले. गिरीशने तिचा नंबर अभी नावाच्या आरोपीला दिला. अभीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिचे फोटो, व्हिडीओ काढले आणि ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या मित्रांनीही पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.


ADVERTISEMENT
Previous Post

ऐन महागाईत पेट्रोलचंही शतक, 3 अंकी किंमतीमुळे पंप पडले बंद

Next Post

उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य, टॅग नसेल तर दुप्पट टोल लागणार

Next Post

उद्यापासून फास्ट टॅग अनिवार्य, टॅग नसेल तर दुप्पट टोल लागणार

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी : श्रीनिवास पाटील, रणजितसिंह नाईक-निंबाळकर

March 6, 2021

जिल्ह्यातील चार टोळ्यातील 18 जण तडीपार जिल्हा पोलीस प्रमुखांची मोठी कारवाई : नागरिकांतून समाधान

March 6, 2021
औंध येथील उपोषणकर्ते ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांच्याशी चर्चा करताना तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर व अन्य

औंध येथील ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांचे बेमुदत उपोषण पाचव्या दिवशी ही सुरू; तालुका कूषी अधिकार्यांची उपोषण स्थळी भेट

March 6, 2021

महिलेचा विनयभंग

March 6, 2021

धारदार शस्त्राने वार करून सव्वा लाखाचा ऐवज लुटला 

March 6, 2021

आईसाहेब महाराज पालखी सोहळ्याचे भाडळी बु.।। येथे स्वागत

March 6, 2021

महिला दिनानिमित्त बोरावके हिरो मध्ये सर्व स्कूटरवर भरघोस सूट

March 6, 2021

भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे; कॉलिटी कंट्रोल मार्फत तपासणी करूनच रस्त्याची कामे सुरू करावीत : खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

March 6, 2021

बांध फोडल्याचा जाब विचारलाच्या मारहाणीत सहा जण जखमी

March 6, 2021

ताथवडा घाटात दरोडा टाकून लूटमार करणाऱ्या टोळी फलटण ग्रामीण पोलिसांकडून जेलबंद

March 6, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.