
फलटण येथील ब्रिलियंट अकॅडमीचा विद्यार्थी रणवीर जगताप याने एसओएफ हिंदी ऑलिम्पियाड २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदकासह रोख पारितोषिक पटकावले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. ०१ जुलै : श्री सद्गुरू प्रतिष्ठान संचलित ब्रिलियंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी रणवीर अविनाश जगताप याने एसओएफ हिंदी ऑलिम्पियाड २०२५ मध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक पटकावले आहे. त्याच्या या यशामुळे फलटणच्या शैक्षणिक वर्तुळातून मोठे कौतुक होत आहे.
रोख पारितोषिकाने सन्मान
रणवीरने या परीक्षेत उत्तम कौशल्य आणि चिकाटीच्या जोरावर झोनल सुवर्णपदक (Zonal Gold Medal) आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक मिळवून शाळेचा लौकिक वाढवला. त्याच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत एसओएफ ऑलिम्पियाडतर्फे त्याला २५०० रुपयांचे रोख पारितोषिकही प्रदान करण्यात आले आहे.
मान्यवरांकडून अभिनंदन
रणवीरने मिळवलेल्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष दिलीपसिंह भोसले, उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले, संचालक अॅड. मधुबाला भोसले, प्रशासकीय संचालिका तथा उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले आणि प्राचार्य नाजनीन शेख यांच्यासह शिक्षक वर्गाने त्याचे अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.