
स्थैर्य, फलटण, दि. २१ ऑक्टोबर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या फलटण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, तयारीचा आढावा घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील हे फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचा झंझावाती दौरा करणार आहेत. बुधवार, २२ ऑक्टोबर ते शनिवार, २५ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत ते जिल्हा परिषद गटनिहाय आणि फलटण शहरातील प्रभागनिहाय बैठका घेऊन नियोजनाचा आढावा घेणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे २६ ऑक्टोबर रोजी फलटण शहरात येत असून, त्यांच्या हस्ते मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होणार आहे. या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यासाठी आणि महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नियोजनाबाबत सूचना देण्यासाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांनी हा विस्तृत दौरा आखला आहे.
या दौऱ्यात ते प्रत्येक जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत, तसेच फलटण शहरातील प्रत्येक प्रभागात जाऊन तेथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, या बैठकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
बैठकांचे नियोजन खालीलप्रमाणे:
दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ (बुधवार):
- सकाळी ११:०० वा: कोळकी जिल्हा परिषद गट (स्थळ: कोळकी रेस्ट हाऊस)
- सकाळी १२:०० वा: दुधेबावी पं.स. गण बैठक (स्थळ: कोळकी रेस्ट हाऊस)
- सायं. ७:०० वा: उ. कोरेगाव (स्थळ: मंगल कार्यालय पिंपोडे बु.)
दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ (गुरुवार):
- सकाळी १०:०० वा: वा. निंबाळकर पं.स. गण (स्थळ: स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लि., उपळवे)
- दुपारी १:०० ते ४:०० वा. पर्यंत: निसर्ग हॉटेल, सुरवडी
- दुपारी ४:०० ते ६:०० वा. पर्यंत: तरडगाव, आदंर्की व हिंगणगाव येथील विकास कामांचे भूमिपूजन
- सायं. ६:२० वा: मालोजी नगर, कोळकी येथील देशपांडे हॉस्पिटल भूमिपूजन
- सायं. ७ वा: विडणी जि.प. गट – पिंप्रद
- सायं. ७:३० वा: बरड पं.स. गण – पिंप्रद
- दु. ०३:०० वा: गुणवरे जि.प. गट (स्थळ: गोखळी)
दिनांक २४ ऑक्टोबर २०२५ (शुक्रवार) – फलटण शहर:
- सं. ४:०० वा: प्र.क्र.१ (स्थळ: महादेव मंदिर, सोमवार पेठ)
- सं. ५:०० वा: प्र.क्र.२ व ३ (स्थळ: डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, मंगळवार पेठ)
- सं. ६:०० वा: प्र.क्र.४ (स्थळ: भैरवनाथ मंदिर, भैरोबा गल्ली)
- सं. ७:०० वा: प्र.क्र.५ (स्थळ: स्वामी मंदिर, मलठण)
- सं. ८:०० वा: प्र.क्र.६ (स्थळ: अभिनव चौक, मलठण)
- सं. ९:०० वा: प्र.क्र.७ (स्थळ: भोसले वाडा, चिंचेचा झाडाखाली)
दिनांक २५ ऑक्टोबर २०२५ (शनिवार) – फलटण शहर:
- सं. १०:०० वा: प्र.क्र.८ व ११ (स्थळ: नवलबाई मंगल कार्यालय)
- सं. ११:०० वा: प्र.क्र.९ (स्थळ: फलटण)
- सं. १०:०० वा: प्र.क्र.१० (स्थळ: जलमंदिर)
- सं. १०:०० वा: प्र.क्र.१२ (स्थळ: फलटण)
- सं. १०:०० वा: प्र.क्र.१३ (स्थळ: गणपती मंदिर, आर्यमान हॉटेल शेजारी)
या सर्व बैठकांना संबंधित गटातील, गणातील व नगरपालिका प्रभागातील सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

