फलटणमधून रणजितदादांनाच लीड मिळणार?


दैनिक स्थैर्य | दि. 29 मे 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या काही दिवसांपूर्वी मतदान प्रक्रिया संपूर्ण झाली यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. गत पाच वर्षातील खासदार रणजितसिंह यांनी केलेल्या विकासकामे व फलटणचा सुपुत्र असल्याने फलटणकरांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच मोठे मताधिक्य दिले असल्याची चर्चा सध्या फलटणच्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.

दि. 04 जून रोजी सोलापूर येथे माढा लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे. यासाठी फलटण तालुक्यामधून अनेक जण जाणार आहेत. या सर्व बाबींचा विचार करता फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याच्या चर्चा सध्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये सुरू आहेत.

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे उभे होते. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी कडवे आव्हान उभे केलेले होते. माढा लोकसभा मतदारसंघाचा निकाल काही दिवसांमध्ये जाहीर होणार आहे. निकालापूर्वीच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ मधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झालेल्या आहेत.

फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपारिक विरोधक असलेल्या विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वामध्ये कार्यरत असणाऱ्या राजे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा फलटण तालुक्यामधून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मतमोजणी प्रक्रिया होण्यापूर्वीच फलटण मधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मताधिक्य मिळणार असल्याच्या चर्चा त्यांचेच विरोधक करीत आहेत.

फलटण शहरासह तालुक्यांमधील अनेक राजकीय अभ्यासकांशी चर्चा केल्यानंतर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठ्या मतांची मताधिक्य मिळेल असे सर्वजण नाव न घेण्याच्या अटीवर व्यक्त होत आहेत. यासोबतच प्रत्येकाचा मताधिक्याचा आकडा वेगळा येत असला तरी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच मताधिक्य असेल असाच बोलबाला सर्वत्र आहे.


Back to top button
Don`t copy text!