दैनिक स्थैर्य | दि. 29 मे 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघांमधून महायुती अर्थात भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आलेली होती. उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पार्टीने सर्व ताकद लावून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा खासदार बनवण्यासाठी फिल्डिंग आखलेली होती.
माढा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया काही दिवसांपूर्वी संपन्न झाली. यानंतर दि. 4 जून रोजी मतमोजणी प्रक्रिया संपन्न होणार आहे. त्यापूर्वीच खासदार रणजितसिंह यांच्या कार्यकर्त्यांकडून भावी केंद्रीय मंत्री म्हणून खासदार रणजितसिंह यांचे सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे.