रणजितसिंह देशमुखांचे लोकाभिमुख कार्य कौतुकास्पद – डॉ सुधीर भोंगळे; खटाव माण च्या पत्रकार स्नेह मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद


 

स्थैर्य खटाव, दि.१३: माण खटाव तालुके कायम दुष्काळी म्हणून परिचित असले तरी अशा प्रतिकूल परिस्थितीत हरणाई उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक अडचणी वर मात करत संस्थापक औद्योगिक क्षेत्रातील यशाचे सर्वोच्च शिखर गाठले असून या सर्व प्रवासाचा मी स्वतः साक्षीदार असून,रणजितसिंह देशमुख यांच्या रूपाने दुष्काळी खटाव माण ला एक लोकाभिमुख विकासक निसर्ग प्रेमी उद्योजक लाभला आहे, असे मत सुप्रसिद्ध लेखक व जल तज्ञ डॉ सुधीर भोंगळे यांनी व्यक्त केले.

दीपावली निमित्त खटाव माण तालुक्यातील सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या येळीव ता खटाव येथील हरणाई सहकारी सूत गिरणी येथील “स्नेह मेळावा व कार्यशाळा” या कार्यक्रमात डॉ भोंगळे बोलत होते. रणजितसिंह देशमुख यांनी सहकार उद्योग यशस्वी करून दाखवलाच पण अनेक फळझाडे, फुलझाडे व शेतीकडे ही लक्ष दिले असून पाण्याचे ही शास्त्रोक्त पद्धतीने नियोजन केले आहे, असे सांगून भोंगळे यांनी उपस्थित पत्रकारांना आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती व पाण्याचे नियोजन याबाबत सखोल मार्गदर्शन केले.ही कार्यशाळा पत्रकारितेची नसून आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेती ची आहे,यामध्ये पक्ष किंवा कोणत्याही प्रकारची युक्ती नसल्याचे रणजित सिंह देशमुख यांनी सांगितले.

यावेळी हरणाई सूत गिरणी मधील अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला दिवाळीची मदत करण्यात आली. सर्वाना स्नेह भोजन व दिवाळी वस्तू चे गिफ्ट देण्यात आले. कार्यक्रमास डॉ महेश गुरव,विकास साबळे परेश जाधव ,हनुमंत भोसले, रणधीर जाधव देवानंद निकम ,सत्यवान कांबळे, भिमराव खीलारे यांचे सह सुमारे ८०हुन अधिक पत्रकार उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!