अपात्रतेच्या शक्यतेने रामराजेंची माघार; सातारा जिल्हा बँक निवडणुकीत मोठी घडामोड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दहा वर्षांच्या निकषामुळे संभाव्य अपात्रतेचा धोका ओळखून रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्हा बँकेतील आपले दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

स्थैर्य, सातारा, दि. १९ ऑक्टोबर : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. सलग दहा वर्षांच्या निकषामुळे संभाव्य अपात्रतेचा धोका ओळखून विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले दोन्ही उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.

दोन मतदारसंघांतून अर्ज माघारी

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी कृषी प्रक्रिया आणि फलटण विकास सेवा सोसायटी या दोन मतदारसंघांतून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, सलग दहा वर्षे संचालक पद भूषवल्याच्या नव्या निकषामुळे हे दोन्ही अर्ज त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

न्यायालयाने सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्यांना पुन्हा संधी नाकारल्याने जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना फटका बसला आहे. याच संभाव्य अपात्रतेच्या कारवाईचा धोका टाळण्यासाठी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपले अर्ज मागे घेतल्याची चर्चा सध्या सहकार आणि राजकीय वर्तुळात सुरू आहे.

यामुळे बँकेच्या निवडणुकीतील चुरस आणि समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!