फलटण संस्थानाने नेहमीच पुरोगामी व विकासाचे धोरण अवलंबले; संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे प्रतिपादन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण संस्थानाने ऐतिहासिक काळात स्वकीय संस्कृती जपत शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला प्राधान्य दिल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी राष्ट्रीय परिषदेत स्पष्ट केले.

स्थैर्य, फलटण, दि. १९ ऑक्टोबर : फलटण नाईक निंबाळकर घराण्याने आधुनिक व पुरोगामी विचार जोपासत शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन दिले आहे. ब्रिटीश काळात कोल्हापूर, सातारा, बडोदा आणि फलटण या संस्थानांनी स्वकीय संस्कृती जपून प्रगतीचा मार्ग अवलंबला, असे प्रतिपादन संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

मुधोजी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद

सातारा इतिहास संशोधन मंडळ व मुधोजी महाविद्यालय येथील इतिहास विभागाने आयोजित केलेल्या १७ व्या वार्षिक अधिवेशनात आणि एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. फलटण संस्थानात १८८३ मध्ये मुधोजीराजे यांनी शिक्षणाचा पाया घातला. राजर्षी शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज, श्रीमंत मालोजीराजे आणि सयाजीराव गायकवाड यांनी शैक्षणिक, सामाजिक क्रांती घडवून सहकार व आधुनिकता आणली. या पुरोगामी विचारांमुळेच पुढे कर्मवीर भाऊराव पाटील आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या शिक्षणमहर्षींना शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवणे शक्य झाले.

पुरोगामी विचारांचा समाजावर मोठा प्रभाव

प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. अवनीश पाटील यांनी सांगितले की, कोल्हापूर, सातारा आणि फलटण ही संस्थाने सामाजिक व राजकीयदृष्ट्या पुरोगामी होती. फलटण संस्थानात रुजलेल्या पुरोगामी विचारांचा बाहेरील समाजावर मोठा प्रभाव पडला. या परिषदेसाठी विविध प्राध्यापक व देणगीदारांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले, तर प्रा. अभिजित कदम यांनी आभार मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!