रामचंद्र काळे राजर्षी शाहू पुरस्काराने सन्मानित

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 16 जून 2025 । फलटण । वडले ता. फलटण येथील रामचंद्र भिवाजी काळे यांना कोल्हापूर येथील मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दिक्षा चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या तर्फे दिला जाणारा यंदाचा राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आला आहे.

रामचंद्र काळे हे गेली तेरा वर्ष एस. टी. महामंडळ मध्ये सातारा आगारात लेखाकार या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्यांना मानवाधिकार राज्यस्तरीय सह्याद्री सन्मान सेवारत्न पुरस्कार, राज्यस्तरीय मल्हार रत्न पुरस्कार, राज्यस्तरीय मुंबई संध्या वृत्तपत्र पुरस्कार, राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्कार, राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार या पुरस्काराने त्यांना यापूर्वी सन्मानीत करण्यात आले आहे.

पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे वडले ग्रामस्थ, एस. टी. महामंडळ सातारा आगारातील पदाधिकारी आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले. हा पुरस्कार रविवार दि. 29 जून रोजी वितरीत करण्यात येणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!