खरशिंगे येथील प्राथमिक शिक्षक राजेंद्र सानप यांना यंदाच्या तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य ,खरशिंगे, दि, २८: खरशिंगे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र बबन सानप यांना यंदाच्या तालुकास्तरिय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात करण्यात आले.

खटाव तालुका शिक्षण विभाग व पंचायत समिती यांच्या वतीने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

राजेंद्र सानप मागील पंधरा वर्षांपासून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. त्यांनी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी तसेच सर्वागीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले आहेत.विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत चमकावेत म्हणून त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. कोरोना काळातही विद्यार्थ्यांना त्यांनी शैक्षणिक मार्गदर्शन केले तसेच स्पर्धा परिक्षेविषयी माहिती दिली आहे.

त्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, समाजकल्याण सभापती कल्पना खाडे,शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे, मंगेश धुमाळ, शिवाजीराव सर्वगोड,संदिप मांडवे,सभापती जयश्री कदम, उपसभापती हिराचंद पवार, गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, लक्ष्मण पिसे शिक्षक संघाचे नेते सुनील सावंत, सुर्यकांत कदम आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!