
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२२ । आटपाडी । डॉ.शंकरराव खरात यांचे जन्मशताब्दी निमित्ताने ,श्रीमंत बाबासाहेब देशमुख साहित्य नगरी आटपाडी ,जवळे सभागृहात गेली दोन दिवस 11 ते 12 जुलै 2022 रोजी भव्यदिव्य ग्रंथ दिंडी सह मोठी दर्जेदार साहित्य संमेलन डॉ खरात संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी मोठया यशस्वीरीत्या पार पाडले सोबत शासनाची वाट न पहाता डॉ खरात यांच्या स्मारकासाठी स्वतःची 1 एकर जागा देऊन जे दातृत्व दाखविले त्याबद्दल फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन तर्फे जेष्ठ संपादक abp माझा चॅनेल चे राजीव खांडेकर यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी भेट दिली.
