राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पावसाचा अडसर

मुंबई, पुण्याचे संघ गुरुवर्य करंडकच्या उपांत्य फेरीत; प्रेक्षकांचा हिरमोड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । 21 मे 2025। सातारा । गुरुवर्यकरंडक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत मुंबई उपनगरमधील स्वस्तिक क्रीडा मंडळ, भोसरी (पुणे) येथील भैरवनाथ संघ, बाणेर (पुणे) येथील सतेज संघ आणि पुण्यातीलच चेतक संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत उपांत्यफेरी गाठली. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास पावसामुळे स्पर्धेत व्यत्यय आला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती, त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला.

गुरुवर्य बबनराव उथळे यांच्या 99 व्या जयंतीनिमित्त श्री शिवाजी उदयमंडळाने मंडळाच्या क्रीडांगणावर या स्पर्धेचे आयोजन केले आहे. दुपारच्या सत्रात उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यांना प्रारंभ झाला. यामध्ये भोसरीमधील भैरवनाथ संघाने टाकळीभानच्या आझाद क्रीडा मंडळाचा 24-17, स्वस्तिक क्रीडा मंडळाने होती.संभाजीनगरच्या साई सेवा क्रीडा मंडळाचा 24-23, चेतक स्पोर्ट पार्ले स्पोर्टस्चा 43-33, सतेज संघाने शिरोलीच्या छावा क्रीडा मंडळाचा 40-21 असा पराभव केला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!