साताऱ्यात दोन जुगार अड्ड्यांवर छापे 

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, सातारा, दि .२९: सातारा शहरातील दोन ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. रविवार पेठेतील अन्नपूर्णा वडापाव सेंटरजवळ पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला.

या कारवाईत एक हजार 260 रुपय रोख व साहित्य जप्त करण्यात आले. उमेश उत्तम तपासे (वय 32, रा.मल्हारपेठ,सातारा), महेश सुर्यकांत बल्लाळ (रा.अंजली कॉलनी, सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. साई बाबा मंदीर कमानीचे शेजारी विजय हाईटस्‌ समोर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी शाहीर शब्बीर सय्यद (रा. बुधवारपेठ, सातारा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन हजार 352 रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. दोन्ही कारवाया सातारा शहर पोलिसांनी केल्या आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!