मटका अड्ड्यावर छापा; 53 हजाराचा ऐवज जप्त


स्थैर्य, खटाव, दि. १८: चोराडे, ता. खटाव येथे मटका अड्ड्यावर छापा मारून सुमारे 53 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सातारा येथील पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे चोराडे येथील एका दुकानाच्या जवळील आडोशाला छापा मारला असता त्याठिकाणी सहदेव जगन्नाथ जानकर वय 35, तानाजी रघुनाथ पिसाळ वय 35 दोघेही रा.चोराडे व रविंद्र यशवंत भंडारे वय 49 रा. वडगाव ज.स्वा.ता.खटाव हे मटका घेत असल्याचे आढळून आले यावेळी पथकाने छापा मारून त्यांच्या जवळील रोख 1600 रुपये, मोबाईल, दुचाकी गाडी असा एकूण 52 हजार 880 रुपयांचा ऐवज जप्त करून अवैध्यरित्या मटका घेत असलेबद्दल तिघांवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी धीरज महाडिक यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


Back to top button
Don`t copy text!