
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि. ८: सातारा शहर व परिसरात पोलिसांनी दोन जुगार अड्ड्यावर छापे टाकून तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
शाहूपुरी पोलिसांनी सातारा शहरातील जुन्या जनावरांच्या दवाखान्याशेजारील एक मैदानात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत 135 रुपये रोख व जुगाराची साधने जप्त केली असून रफिक शेख वय 32 रा. शनिवार पेठ, सातारा आणि गुलाब यासिन आतार रा. गडकर आळी सातारा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, समर्थनगर सातारा येथील पालकर मटण शॉपच्या पाठीमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून एकास अटक केली. या छाप्यात 2760 हजार रोख तसेच जुगाराची साधने आणि मोबाईल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शंकर व्यंकट पवार वय 38 रा. अंगापूर, ता. जि. सातारा आणि समीर सलीम कच्छी रा. सैदापूर, ता. सातारा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
