
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १४ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकात एका पत्र्याच्या शेडच्या आडोशाला सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत २ हजार ९८0 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी कृष्णा चंद्रकांत बनसोडे (वय ३१, रा. वनवासवाडी, ता. जि. सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला प्रतिबंधात्मक नोटीस बजावण्यात आली आहे. सातारा शहर पोलिसांनीच हा गुन्हा दाखल केला आहे.
