
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | येथील जुना मोटर स्टँड परिसरात जुगार अड्डयावर छापा टाकून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात असणाऱ्या कृष्णा टॉकीजच्या समोर पान टपरीच्या आडोशाला संतोष सुर्यकांत कांबळे, वय ४८, रा. गेंडामाळ, जकात नाका, शाहुपुरी, विनोद रमेश मोहिते, वय ४०, रा. सोमवार पेठ, सातारा, समीर सलीम कच्छी, रा. मोळाचा ओढा, सातारा यांच्याकडून पोलिसांनी १ हजार ४४४ रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत केले.



