गोसावी गल्लीतील राहुल जाधव सातारा जिल्ह्यातुन तडीपार


स्थैर्य, फलटण, दि. २२: फलटण शहर पोलीस ठाणे हद्दीत जबरी चोरी यासारखे गुन्हे करीत असलेला राहुल राजेंद्र जाधव रा. गोसावी गल्ली, मलटण, ता. फलटण याचे वर यापूर्वी प्रतिबंधक कारवाई करून त्यास सुधारण्याची संधी देऊन देखील त्याच्या वर्तनात सुधारणा झालेली नव्हती. त्याचा सर्वसामान्य जनतेस उपद्रव होत होता. मलटण मधील जनतेमधून त्याच्यावर कडक कारवाई करण्याकरिता वारंवार मागणी होत होती. फलटणचे उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी सदर बाबीचे गांभीर्य ओळखून नमूद इसम राहुल राजेंद्र जाधव, रा. गोसावी गल्ली, मलटण, ता. फलटण यास सातारा जिल्ह्यातून एक वर्षाकरिता तडीपार करण्यात आले आहे. फलटण शहरात अशाच प्रकारे समाजामध्ये भीती,दहशत पसरवणार्‍या गुंडांचे व चोऱ्या, मारामारी करणाऱ्या इसमा विरुद्ध अशा प्रकारचे कडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती फलटण शहर पोलीस स्टेशनचे निरिक्षक भारत किंद्रे यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!