स्थैर्य, दि.४: ‘राहुल गांधी यांच्यात देश
चालवण्यासाठी लागणारे सातत्य नाही,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एका मुलाखतीदरम्यान केले आहे. याशिवाय,
पवारांनी अमेरिके माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी आपल्या पुस्तकातून
राहुल गांधींवर केलेल्या टीकेलाही अयोग्य म्हटले आहे.
‘सध्या
देश राहुल गांधींचे नेतृत्व स्विकारण्यास तयार आहे का ?’ या प्रश्नावर
पवार म्हणाले की, ‘याबाबत अनेक तर्क-वितर्क आहेत. सध्या त्यांच्यात(राहुल
गांधी) सातत्याची कमतरता आहे.’ सध्या राज्यात
शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार आहे. त्यामुळेच, पवारांच्या या
वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटू शकते.
राहुल गांधीवरील ओबामांची टीका अयोग्य
बराक
ओबामा यांनी राहुल गांधींवर केलेल्या टीकेवर शरद पवार म्हणाले की, ‘आपल्या
देशातील नेत्यांबद्दल काहीही बोलू शकतो. पण, दुसऱ्या देशातील नेत्यांबाबत
काही बोलणार नाही.इतकच म्हणेल की, राहुल यांच्यावर ओबामा यांनी केलेली टीका
अयोग्य होती.’
काही
दिवसांपूर्वी बराक ओबामा यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यात
त्यांनी राहुल गांधीवर टीका करताना त्यांना नर्वस विद्यार्थी म्हणत,
त्यांच्या आत्मविश्वासाची कमतरता असल्याचे म्हटले होते. यावरुन देशात खूप
चर्चा झाली होती.