स्थैर्य, मुंबई, दि.४: देशात कोरोनाव्हायरसचं
(coronavirus) थैमान सुरू आहे. कित्येक महिन्यांच्या लॉकडाऊननंतर देश अनलॉक
झाला आहे आणि मग बॉलिवूडही (Bollywood) कामाला लागलं आहे. फिल्म्सच्या
शूटिंग सुरू झाल्या आहेत आणि आता शूटिंगसाठी घराबाहेर पडलेले सेलिब्रिटी
कोरोनाच्या विळख्यात सापडू लागले आहेत. ‘जुग जुग जियो’ (Jug Jug Jiyo)
फिल्मचे लीड कलाकारच कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) झाले आहेत.
आगामी
फिल्म ‘जुग जुग जियो’ तील अभिनेत्री नीतू कपूर (Neetu Kapoor), वरुण धवन
(Varun Dhawan) यांना कोरोना झाला आणि आता अभिनेता अनिल कपूर (Anil Kapoor)
देखील कोरोना संक्रमित झाल्याची माहिती मिळते आहे.
- दैनिक स्थैर्यचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा -
टेलिग्राम । डेली हंट । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम । गुगल न्यूज
विरल भयानीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर याची माहिती दिली आहे.
माहितीनुसार अनिल कपूर, नीतू कपूर, वरुण धवन, कियारा आडवाणी आणि प्राजक्ता
कोली यांनी नुकतीच दिग्दर्शक राज मेहताची फिल्म जुग जुग जियोचं शूटिंग सुरू
केलं होतं. ‘जुग जुग जियो’ च्या कास्टचे प्रमुख कलाकार कोरोना संक्रमित
झाले आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री कियारा आडवाणी आणि
दिग्दर्शक राज मेहतादेखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. दरम्यान याबाबत कुणीही
अधिकृत माहिती दिलेली नाही.