रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट चे वतीने 3 लाख रूपये शिष्यवृत्तीचे वाटप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इयत्ता बालवाडी पासून बारावी पर्यंत तसेच जिल्ह्यातील  सामाजिक व सेवाभावी संस्थांना मदतीचे वितरण

स्थैर्य, सातारा, दि. १२ : सातारा येथील गोडबोले कुटुंबियांच्या वतीने मागील 49 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने यावर्षीचा विद्यार्थी शिष्यवृत्ती वितरण सोहळा समर्थ सदन येथे संपन्न झाला. ट्रस्टच्यावतीने मदत वाटप करण्याचे 49 वे वर्ष आहे. यावर्षी करोना च्या संकटामुळे दरवर्षी साजरा होणारा शिष्यवृत्ती वाटपाचा जुलै महिन्यातील कार्यक्रम अखेर ऑक्‍टोबर महिन्यात घेण्यात आला. यावर्षी तीनशेहून अधिक विद्यार्थी व संस्थांचे मदतीचे अर्ज आले होते. त्या सर्वांना मिळून एकूण तीन लाख रुपये शिष्यवृत्ती ची मदत वाटप करण्यात आली.

इयत्ता बालवाडी पासून बारावी पर्यंत तसेच जिल्ह्यातील काही सामाजिक व सेवाभावी संस्थांना या मदतीचे वितरण ट्रस्ट चे अध्यक्ष अरुण गोडबोले आणि सातारचे माजी नगराध्यक्ष व बालरोगतज्ञ डॉ. अच्युत गोडबोले यांचे हस्ते वितरीत करण्यात आले .समर्थ सदन सांस्कृतिक केंद्र येथे सामाजिक अंतर राखून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे ही शिष्यवृत्ती तीन टप्प्यात वितरित न करता सकाळी 9 ते 12 या वेळेत या सर्व शिष्यवृत्ती धारकांचे पालकांना बोलावून त्यांच्या कडे ही मदत सुपूर्त करण्यात आली. यावेळी कौशिक प्रकाशन चे वाचनीय असे अकरा मारुतींची माहिती देणारे पुस्तकही भेट स्वरुपात देण्यात आले.

या कार्यक्रमाविषयी बोलताना अरुण गोडबोले म्हणाले की बन्याबापू गोडबोले यांनी सुरू केलेल्या ट्रस्ट ला आता 49 वर्षे पूर्ण झाली असून गोडबोले कुटुंबीयांची तिसरी पिढी या सामाजिक उपक्रमात सहभागी होत आहे याचा मोठा आनंद वाटतो. यावर्षी  करोना च्या संकटामुळे दरवर्षीप्रमाणे घेतला जाणारा भव्य सोहळा रद्द करून ही मदत गरजूंना पोहोचावी यादृष्टीने हा छोट्या रुपात कार्यक्रम घेण्यात आला.

या समारंभाचे संयोजनासाठी आयडीबीआय ट्रस्तीशिप कंपनीच्या मानसी माचवे, मानसी पत्की  यांचेसह गोडबोले कुटुंबियांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी गोडबोले कुटुंबीयां पैकी माधवराव गोडबोले .उदयन गोडबोले .अशोक गोडबोले प्रद्युमन गोडबोले ,आर्यन गोडबोले आदींची प्रमुख उपस्थिती होती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!