
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. १६ मे २०२३ । सातारा । “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान” शिबीराचे आयोजन दि. 17 मे रोजी सकाळी 10 वा. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, सातारा कार्यालय हॉल, बाल विकास भवन, गोडोली, सातारा येथे करण्यात आल्याची माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी संदीप भिंगारे यांनी दिली आहे.
समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या अडचणींचा शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पीडित महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तालुकास्तरावर “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान” शिबीराचे आयोजन केले आहे.
