दैनिक स्थैर्य | दि. १ जून २०२३ | फलटण |
आळजापूर (ता. फलटण) ग्रामपंचायत कार्यालय येथे बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार’ सौ. कौशल्या गंगाराम निंबाळकर (माजी अंगणवाडी सेविका) व सौ. पल्लवी गणपत नलवडे (आशा सुपरवायझर) यांना प्रदान करण्यात आला.
यावेळी संतकृपा उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री. विलासराव नलवडे, श्री. शंकर नलवडे (पोलीस पाटील), सरपंच श्री. शुभम नलवडे, उपसरपंच सौ. छाया जालिंदर नलवडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. राजकुंवर नलवडे, सौ. पुष्पा पवार, सौ. गीतांजली नलवडे, श्री. सुनील काशिनाथ पवार, श्री. प्रकाश शिंदे (व्हा.चेअरमन), श्री. चंद्रकांत पवार, श्री. जालिंदर नलवडे, श्री. मनोहर नायकुडे, श्री. अशोक पवार, श्री.वसंत केंजळे, श्री. ऋतुराज नलवडे, ग्रामसेवक श्री. सापते, श्री. गणपत नलवडे, श्री. अतुल शिंदे, श्री. मोहन मसुगडे, श्री. जालिंदर खुडे तसेच ग्रामस्थ, महिला, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.