पुण्यात नवे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर; विद्यार्थ्यांचे स्वप्न होणार पूर्ण

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

पुण्यातील ईएसआयसी रुग्णालयात ५० जागांचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली असून वैद्यकीय शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.

स्थैर्य, पुणे, दि. १४ ऑक्टोबर : पुण्यातील ईएसआयसी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयासाठी केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून हे महाविद्यालय सुरू होणार असून यामध्ये ५० एमबीबीएस जागांना मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी निर्माण होणार आहे.

केंद्राकडून महाराष्ट्राला मोठी भेट

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे राज्यातील डॉक्टर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांचा मार्ग सुकर होणार आहे. महाराष्ट्राला अधिक संख्येने वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होण्यास या निर्णयामुळे गती मिळणार आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाद्वारे माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचे आभार मानले आहेत.

वैद्यकीय शिक्षणाला नवी गती

राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी ही मंजुरी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पुण्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असल्याने उच्च वैद्यकीय शिक्षणाच्या सुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे. शैक्षणिक वर्ष २०२७-२८ पासून ५० विद्यार्थ्यांची पहिली बॅच या महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!