पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. राजू पाटोदकर यांची फलटणला सदिच्छा भेट


दैनिक स्थैर्य । दि.15 नोव्हेंबर 2021 । फलटण । माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पुणे विभागीय उपसंचालक डॉ.राजू पाटोदकर यांनी फलटण येथे आज सदिच्छा भेट देवून पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्ञानेश्वर जराड, पत्रकार नासीर शिकलगार, दादासाहेब चोरमले, महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक संघाचे संचालक अ‍ॅड.रोहित अहिवळे, फलटण तालुका वृत्तपत्र संपादक संघाचे अध्यक्ष विशाल शहा, उपाध्यक्ष बापूराव जगताप, सेक्रेटरी रोहित वाकडे, कार्यकारिणी सदस्य प्रसन्न रुद्रभटे, भारद्वाज बेडकिहाळ, राजेंद्र गोडसे, पुणे विभागीय माहिती कार्यालयातील विलास कसबे आदींची उपस्थिती होती.

यावेळी फलटण तालुक्यातील पत्रकार व संपादकांच्यावतीने डॉ.पाटोदकर यांचे रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते सत्कार करुन स्वागत झाल्यानंतर दैनिक स्थैर्यच्यावतीने संपादक प्रसन्न रुद्रभटे यांनी दिवाळी विशेषांक, साप्ताहिक स्थैर्य एक्सप्रेसचा अंक व पुष्पगुच्छ देवून डॉ.पाटोदकर यांचे स्वागत केले. तद्नंतर फलटण येथील मुधोजी मनमोहन राजवाड्यास डॉ.पाटोदकर यांनी धावती भेट दिली.


Back to top button
Don`t copy text!