जनतेच्या सेवेसाठी पुन्हा जनसंपर्क कार्यालय सुरु करणार : जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । सुरवडी । फलटण तालुक्यातील महत्वाची समजली जाणाऱ्या व राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या साखरवाडीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये जनतेच्या सेवेसाठी जनसंपर्क कार्यालय सुरु करणार असल्याची माहिती फलटण तालुल्याचे जेष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील यांनी दिली.

साखरवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये व नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये साखरवाडी भागातील नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे. साखरवाडीसह फलटण तालुक्यामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आमच्याबाबत पूर्ण विश्वास आहे. आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये आम्ही सर्व जण आमच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर पुन्हा एकदा ताकदीने उभा राहणार आहोत. आगामी काळामध्ये फलटण तालुक्यात करिष्मा दाखवण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचे मत जेष्ठ नेते प्रल्हाद साळूंखे – पाटील यांनी या वेळी व्यक्त केले.

आमच्या निष्ठावंत कार्यकर्ते हे आम्हाला भेटण्यास सुरवडी येथील हॉटेल निसर्ग येथे मोठ्या प्रमाणावर येत आहेत. कार्यकर्त्यांना पुन्हा ताकद देण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी साखरवाडीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आपण पुन्हा जनसंपर्क कार्यालय सुरु करणार आहोत. साखरवाडीसह फलटण तालुक्यामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना पूर्ण ताकद देणार असल्याचेही यावेळी साळुंखे – पाटील यांनी स्पष्ट केले.

Back to top button
Don`t copy text!