दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२४ | सातारा |
अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नागरिकांसाठी असणार्या योजनांची माहिती त्यांच्याच सोप्या भाषेत लोककला पथकाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. ही मोहीम दि. ९ ते १५ फेब्रुवारी कालावधीत राबवून जनजागृती करण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांनी केले आहे.
या कलापथकांचे कार्यक्रम सातारा तालुक्यातील निगडी तर्फ सातारा, सैदापूर, कराड तालुक्यातील शेरे व कार्वे, पाटण तालुक्यातील म्हावशी, विहे, कोरेगाव तालुक्यातील तारगाव व बारेगाव, फलटण तालुक्यातील खामगाव, बरड, सस्तेवाडी व सुरवडी, खटाव तालुक्यातील कातरखटाव व निढळ, माण तालुक्यातील कुकुडवाड व शिंगणापूर, वाई तालुक्यातील उडतारे व आसले, खंडाळा तालुक्यातील पिंपरे बु. व जवळे, जावळी तालुक्यातील खर्शी तर्फ कुडाळ, इंदवली व सायगाव, महाबळेश्वर तालुक्यातील दुधगाव अशा एकूण २४ गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.