दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू कु. अक्षता आबासाहेब ढेकळे-पाटील यांच्या वाखरी येथील निवासस्थानी भाजपा नेते श्री. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सदिच्छा भेट घेऊन कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या. यावेळी अक्षताचे चुलते रामभाऊ ढेकळे (मा. सभापती, पंचायत समिती, फलटण) हे उपस्थित होते.
यावेळी सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव तथा युवा नेते विशाल पवार, सरस्वती शिक्षण संस्थेच्या संचालिका सौ. संध्या गायकवाड, सौ. प्रियंका पवार यांच्यासह वाखरी पंचक्रोशीतील विविध मान्यवर उपस्थित होते.