दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । बारामती । शनिवार 29 एप्रिल रोजी बारामती शहरातील हनुमंत केशव सातव यांचे प्रथम पुण्यस्मरण होते. सातव कुटुंबाच्या वतीने सामाजिक -विविध उपक्रम राबवून प्रथम पुण्यसमरण साजरे करण्यात आले. या उपक्रमात कथाकार प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी समाज्याची दशा व दिशा ता विषयावर उपस्तितांना मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रम साठी येणाऱ्या प्रत्येकास देशी झाडे घरासमोर लवावीत म्हणून रोपे वाटून पर्यावरण रक्षण चा संदेश देण्यात आला.
वाचन संस्कृती टिकावी व वाचन चळवळ होणे साठी विविध समाज सुधारकांची पुस्तकांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी प्रा. रवींद्र कोकरे ,माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव व पोपटराव ढवान, कल्याणजी पाचांगणे नितीन सातव .प्रकाश सातव, माळेगाव चे मा.संचालक केशव बापु जगताप आणि अविनाश गोफणे प्रदिप डुके, योगेश नालिंदे, संभाजी माने, जयसिंग देशमुख, डॉ नंदकुमार यादव..आदी उपस्तीत होते.
जुन्या रितीरिवाजाना फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली जावी या उदेश्याने प्रथम पुण्यसमरण विविध सामाजिक उपक्रमांनी साजरे केले व यानंतर अशाच प्रकारे कार्यक्रम करण्यासाठी प्रत्यनशील राहणार असल्याचे अर्चना सातव यांनी सांगितले.