महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या संवादमेळाव्यात खाजगीकरणाच्या विरोधात निदर्शने व निषेध


दैनिक स्थैर्य । दि. ०५ मे २०२३ । बारामती । बारामती मध्ये एसटी महामंडळ मधील कामगार संघटना चा संवाद मेळावा संपन्न झाला. या प्रसंगी एसटी मधील खासगीकरण ला व इतर विषयावर चर्चा करून खासगीकरण यास विरोध दर्शवण्यात आला.
या प्रसंगी  संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व राज्य महिला संघटक सचिव शीला नाईकवाडे य, पुणे विभागिय अध्यक्ष मोहन जेधे, विभागिय सचिवा दिलीप परब ,पुणे विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र पवार ,विभागीय कार्यशाळा अध्यक्ष मनोज जगताप , सचिव  राजेंद्र भोसले व पदाधिकारी,कर्मचारी  उपस्थित होते.
दिवसों दिवस राप महामंडळाची ध्येयधोरणे बदलत आहेत , कोविड आणि  एसटी महामंडळाचा प्रदिर्घ चाललेला संप यामुळे झालेल्या प्रचंड तोटा भरून काढण्यासाठी राज्य सरकारने ३५ टक्के खासगीकरणाचा ठराव पास करून घेतलेला आहे. तसेच भाडेतत्त्वावर बाहेरील  गाड्या घेण्याचा व गाड्यांची देखभाल व दुरुस्ती बाहेरील संस्था कडून करून घेण्याचा पण निर्णय घेतलेला आहे. या सार्वजनिक बस उपक्रमातील अनेक क्षेत्राचे मोठ्या प्रमाणावर खाजगीकरण होत आहे. कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने महामंडळात येत आहेत. भरती प्रक्रियेवर स्थगिती आणली आहे. अनेक कामे कंत्राटी कामगाराकडून करून घेतली जात आहेत. मॅक्सिकॕबला  परवानगी देण्याचे व फायद्याचे मार्ग खाजगी वाहतूकदारांच्या ताब्यात देण्याचे धोरण आखले जात आहे. मात्र याचवेळी कामगारांचे वेतन व आर्थिक प्रलंबित मागण्याकडे व हक्काचे काम, आरोग्य आणि सुरक्षा या विषयाकडे प्रशासनाचे व सरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. दर महिन्याला कामगारांचे  पगार वेळेवर होत नाहीत. महागाई भत्ता, घरभाडे ,इन्क्रिमेंट यासारख्या आर्थिक बाबी प्रदीर्घ काळापासून प्रलंबित आहेत. या सर्व बाबीचा निषेध करण्यासाठी सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

Back to top button
Don`t copy text!