कोल्हापुरात ‘जागतिक खोके दिन’ शिवसेना विरोधात आंदोलन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० जून २०२३ । कोल्हापूर । उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या वतीने आज येथील बिंदू चौकामध्ये उपहासात्मक जागतिक खोके दिन साजरा करण्यात आला. राज्यभरात ठिकठिकाणी शिंदे शिवसेनाविरोधात हे आंदोलन करण्यात आले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडाला आज, मंगळवारी (दि.२०) एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने हे उपाहासात्मक आंदोलन ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आले. यावेळी पन्नास खोके एकदम ओके लिहिलेले अनेक खोके बिंदू चौकामध्ये मांडून ठेवण्यात आले होते.

जिल्हाप्रमुख संजय पवार विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे गटाविरोधातील जोरदार घोषणाबाजीने बिंदू चौक परिसर दणाणून गेला.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!