
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि. ०७ : काल मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झाल्यानंतर सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयावर भ्याड हल्ला करण्यात आला. सदरील भ्याड हाल करणाऱ्या हल्लेखोरांना आगामी चोवीस तासाच्या आत अटक करून कारवाई करावी. व पुन्हा असे हल्ले होणार नाहीत, या बाबत दक्षता घेण्यात यावी, अशी मागणी फलटण तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुका अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे.
फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांच्याकडे सविस्तर निवेदन देण्यात आले. या वेळी फलटण तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, अशोकराव शिंदे, पंकज पवार, प्रीतम जगदाळे यांची उपस्थिती होती.
