फलटण: प्रोग्रेसिव्ह स्कूल कोळकीचा १०० टक्के निकाल – विनंती जगदाळे प्रथम

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

कोळकी येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा दहावीचा निकाल सलग सातव्या वर्षी १०० टक्के लागला. विनंती जगदाळे हिने ९४ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 10 मे : महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या (SSC) परीक्षेत कोळकी (ता. फलटण) येथील प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने सलग सातव्या वर्षी १०० टक्के निकालाची गौरवशाली परंपरा कायम राखली आहे. या परीक्षेत विनंती किरण जगदाळे हिने ९४ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

विद्यालयातील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थी:

यंदाच्या परीक्षेत विद्यालयातील चैतन्य गणपत तोरस्कर याने ९३.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला, तर ज्ञानेश्वरी अमरजीत डोंबाळे हिने ९२.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक संपादन केला. विद्यालयातून एकूण २८ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल २५ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले असून, उर्वरित ३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के:

विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशामागे सुजाता गायकवाड, आशादेवी भराडे, महेंद्र कातुरे, अहिल्या कवितके, ज्ञानेश्वर जाधव, स्नेहल भोसले आणि अश्विनी भिसे या शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे, सरस्वती शिक्षण संस्थेच्या कोळकी व गुणवरे या दोन्ही शाखांचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याने संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

संस्थेकडून विद्यार्थ्यांचे कौतुक:

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक भीमराव माने, अध्यक्ष प्रदीप माने, कोषाध्यक्ष सविता माने, सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका संध्या गायकवाड, प्राचार्या सुजाता गायकवाड, पर्यवेक्षक महेंद्र कातुरे, समन्वयिका अहिल्या कवितके आणि माधुरी माने यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!