प्रा. प्रवीण निंबाळकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार प्रदान

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२५ | फलटण |
राजाळे गावचे सुपुत्र प्राध्यापक प्रवीण जगन्नाथ निंबाळकर यांच्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक कार्याची दखल घेऊन महात्मा फुले साहित्य अकादमी पुणे यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या नावे दिला जाणारा ‘राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार’ छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या हस्ते एस. एम. जोशी सभागृह पुणे येथे त्यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, इतिहास संशोधक डॉ. श्रीमंत कोकाटे, युवा उद्योजक गणेश माने देशमुख, आय.आर.एस. विपूल वाघमारे, शिवाजी खांडेकर यांच्या यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. प्रवीण निंबाळकर हे अध्यापक विद्यालय गिरवी, छत्रपती शिवाजी माध्यमिक व ज्युनिअर कॉलेज गिरवी, श्रीराम खोलेश्वर माध्यमिक विद्यालय मुंजवडी या ठिकाणी अध्यापनाचे कार्य करत होते. त्यांना २०२३ साली शिक्षणाधिकारी यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. तसेच आचार्य अकॅडमी बारामती यांनीही आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान केला आहे.

सध्या हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गोखळी येथे ते कार्यरत आहेत.

या पुरस्काराबद्दल जयभवानी एज्युकेश सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम, सचिव शारदादेवी कदम विद्यालयाचे प्राचार्य सुनील सस्ते, सहकारी शिक्षक रसिक कला क्रिडा मंच राजाळे आणि मित्र परिवार परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!