प्रा.बालाजी मन्नाडे यांना सन २०२३ चा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मे २०२३ । छत्रपती संभाजी नगर । सहित्याधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविले जाते. यावर्षी स्व. सौ. वि. वि.अधिकारी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इंग्रजी विषयाचे प्राध्यापक श्री.बालाजी मन्नाडे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार शनिवार दिनांक.२९ एप्रिल,२०२३ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र संभाजी नगर येथे संस्थेचे पदाधिकारी व मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे. प्रा.बालाजी मन्नाडे यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आदर्श शिक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष , खजिनदार सर्व संचालक कार्यकारिणी मंडळ प्रशालेचे मुख्याध्याक शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक ग्रामस्थ विद्यार्थी वर्गातून सरांचे कौतुक करण्यात येत आहे. सर उत्तम कवी व व्याख्याते आहेत ते विविध कविसंमेलनात सहभागी होतात व विविध ठिकाणी व्याख्याने पण देतात.


Back to top button
Don`t copy text!