वडाळा बीपीटी विभागातील कबड्डीपटू गजानन तांबे कालवश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । मुंबई । वडाळा बीपीटी विभागातील सम्राट संघाचे संघप्रमुख तसेच प्रसिद्ध कबड्डीपटू व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते गजानन कृष्णा तांबे मु. साखरगाव, ता. खेड जिल्हा रत्नागिरी यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी बीपीटी रुग्णालय वडाळा येथे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, काही दिवसांपूर्वी प्रकृती खालावल्याने त्याना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
दिवंगत गजानन तांबे हे खिलाडी वृत्तीचे असून प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते, आपल्या खेळातील नैपुण्यामुळे त्यानी सम्राट संघाचे संघप्रमुख पद भूषविले त्यांच्यामागे पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा माटुंगा येथील त्यांच्या राहत्या घरातुन निघून सायन स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अंत्ययात्रेत सर्व स्तरातील, पक्षातील सर्वसामान्य जनता, कार्यकर्ते व खेळाडूंनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
त्यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम ६ मार्च २०२२ रोजी सकाळी १० वाजता, साई विसावा, रूम नं. १०९ इंडियन ऑइल पेट्रोल पंप शेजारी, रुईया महाविद्यालया समोर, माटुंगा, मुंबई -१९ येथे त्यांच्या राहत्या घरी गौतम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्याचे योजिले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!