दैनिक स्थैर्य । दि.०१ जानेवारी २०२२ । फलटण । सरसेनापती हंबीरराव या ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केल्यापासून महाराष्ट्रासह जगभरातील चाहते या चित्रपटाची मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे निर्माते यांनी प्रोग्रेसिव्ह ला भेट दिली.त्यांनी चित्रपटा विषयीची भूमिका व त्या चित्रपटाविषयी माहिती शिक्षकांना दिली व संवाद साधला.
तसेच आत्ताच्या भावी पिढी पुढे हा संपूर्ण इतिहास मांडण्याच्या हेतूने या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली यावेळी त्यांनी स्पष्ट केले.
तसेच चित्रपटातील सर्व टीमचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. सरस्वती शिक्षण संस्थेचे, प्रोग्रेसिव कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड यांनी सर्वांचे शाल श्रीफळ व रोप देऊन स्वागत केले शाळेच्या पुढच्या वाटचालीची व भविष्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली व चित्रपटाच्या निर्मात्यांनी संस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
त्यावेळी निर्माते मा. श्री संदीप दादा मोहिते- पाटील, सौ. वैशाली संदीप मोहिते- पाटील, पुणे जिल्हा शिक्षक संघाचे नेते राजेंद्र मोहिते -पाटील, गायत्री मोहिते -पाटील,शुभम मोहिते- पाटील, संदेश मोहिते -पाटील ,जयश्री मोहिते -पाटील, पृथ्वीराज मोहिते- पाटील, यांचे संस्थेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेच्या संचालिका सौ.संध्या गायकवाड, सौ.प्रियंका पवार, मुख्याध्यापिका सौ.सुमन मकवाना, समन्वयिका सौ. अहिल्या कवितके, पर्यवेक्षक अमित सस्ते, तसेच शिक्षक सौ.रोहिणी ठोंबरे,सुशांत अहिवळे ,निखिल कापले, ज्ञानेश्वर जाधव , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी उपस्थित होते.