मुधोजी महाविद्यालयाचा उद्या पारितोषिक वितरण समारंभ; आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर सुहास खामकर यांची प्रमुख उपस्थिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ मे २०२३ | फलटण |
फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, फलटणचा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दि. १२ मे २०२३ रोजी जिमखाना विभाग, मुधोजी महाविद्यालय फलटण येथे होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी दिली.

या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण बॉडी बिल्डिंग क्षेत्रातील महाराष्ट्रातील अव्वल खेळाडू, तहसीलदार, मुंबई शहर आणि ‘शिवछत्रपती पुरस्कार’ विजेते श्री. सुहास खामकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य खो- खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असणार आहेत. तसेच अन्य मान्यवरही उपस्थित राहणार आहेत.
या मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालयातील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधे क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभागातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतर विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धांमध्ये विशेष प्राविण्य प्राप्त खेळाडू – कलाकार, एन.सी.सी.- एन.एस.एस. व गुणवत्ताधारक विद्यार्थी यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत. यावेळी फलटण तालुक्यातील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास खेळाडू, कलाकार, गुणवंत विद्यार्थी व पालक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. पी. एच .कदम यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!