
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. २९ नोव्हेंबर : प्रभाग ११ मधील भाजप उमेदवार संदीप चोरमले यांनी मतदारांना सोयी-सुविधांचे आश्वासन दिले आहे. या प्रभागातील नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मतदारांशी संपर्क अभियान त्यांनी सुरू ठेवला असून, स्वच्छता, सुविधा आणि आरोग्य हे मुद्दे ते मतदारांशी बोलताना अधिकचे अधोरेखीत करीत आहेत.
रणजितदादांच्या नेतृत्वात पालिकेत सत्ता आल्यास या मूलभूत सुविधांची गुणवत्ता त्वरित सुधारली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकंदरीत, संदीप चोरमले यांनी स्वच्छ प्रभाग आणि उत्तम आरोग्य सुविधा यावर भर दिला आहे.
