सांगोला येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन सादर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २५ एप्रिल २०२३ । सांगोला । देशभरात श्रीराम नवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या शोभायात्रा मिरवणुका यावर आक्रमण करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच पाकिस्तानातील हिंदूंवर होत असलेले अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने कडक पावले उचलावीत या मागणीचे निवेदन सांगोला येथे तहसीलदार यांना हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आले. यावेळी तहसीलदारांच्या वतीने निवडणूक नायक तहसीलदार बी. सी. कोळी यांनी हे निवेदन स्वीकारले. निवेदन देतेवेळी सर्वश्री गणपत पटेल, अतुल चव्हाण, गणेश सुरवसे, सुनील पैलवान, अक्षय क्षीरसागर, डॉक्टर मानस कमलापूरकर, नवनाथ कावळे, विकास गावडे, संतोष पाटणे सर आदी धर्मप्रेमी उपस्थित होते, तर सर्वश्री अवधूत वाघमोडे, प्रकाश वाघमोडे, आकाश खटकाळे यांनी या निवेदनावर स्वाक्षरी केली आहे.
प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिनांक 30 मार्च 2023 या दिवशी श्रीराम नवमी संपूर्ण देशभरात उत्साहात पार पडली; मात्र अनेक राज्यात राम नवमी निमित्त आयोजित मिरवणुकांवर दगडफेक करण्यात आली ज्या ठिकाणी मागील वर्षी रामनवमीच्या मिरवणुकांवर आक्रमण झाले होते तिथे प्रशासनाने अधिक काळजीपूर्वक धर्मांधांचा बंदोबस्त करणे आवश्यक होते; मात्र कुचकामी प्रशासनामुळे यावर्षीही त्यातील काही ठिकाणी मिरवणुकांवर धर्मांधाकडून आक्रमणे झाली हिंदूंचे श्रद्धा असलेल्या श्रीरामाच्या धार्मिक उत्सवावर झालेले भीषण आक्रमण अत्यंत गंभीर आहे. धर्मांधाने रामनवमी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकांवर देशभरात आक्रमणे करून हिंदू समाजाला आणि सरकारला एक संदेश दिला आहे यावरून त्यांना कायद्याचे कोणतेही भय उरलेले दिसत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही आपल्याकडे पुढील मागण्या करत आहोत.
वरील घटना या वृत्तपत्रात छापून आल्या आहेत. प्रत्यक्षात आणखी अनेक ठिकाणी अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात घडले आहेत असतील, जे माध्यमामध्ये प्रसिद्ध झाले नाहीत. अशा सर्व ठिकाणी झालेल्या हिंसाचाराची तातडीने चौकशी करावी. दगडफेकीसह तलवारी घेऊन हिंसक आक्रमण करणे; वाहने आणि घरे पेटवणे सार्वजनिक संपत्तीची हानी करणे आधी सर्व घटना गंभीर आहेत. श्रीराम नवमीच्या दिवशी झालेले आक्रमण हे एक सूनियोजित षड्यंत्र असून एकाच वेळी इतक्या ठिकाणी हिंसक घटना कशा घडल्या यामागे कोणाचा हात आहे ? या सर्व घटनांची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत करावी आणि चौकशीत दोषी सापडल्यांवर कठोर कारवाई करावी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी कलम 295 अ अंतर्गत गुन्हे दाखल करावेत तसेच संघटितपणे दंगल करून हिंदूंवर दहशतीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी दंगल भडकवल्या प्रकरणी गुन्हे दाखल करावेत. यापुढे हिंदूंच्या धार्मिक उत्सवांमध्ये अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात मागील वर्षी ज्या क्षेत्रात हिंसाचार झाला तेथे यंदा हिंसाचार झाला या दृष्टीने पुन्हा हिंसाचार होऊ नये तसेच तेथील हिंदूंना संरक्षण द्यावे या दृष्टीने निष्काळजीपणामुळे नियोजन केले नाही आणि धर्मांधांना रोखण्यात अपयशी ठरले अशा पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करावी सार्वजनिक संपत्तीची झालेल्या हानीची हानी भरपाई दोषींकडून वसूल करण्यात यावी तसेच उत्तर प्रदेशातील योगी सरकार प्रमाणे दंगलखोरांच्या घरांवर बुलडोजर चालवून त्यांच्यावर वचक निर्माण करावा तसेच प्रशासनास दिलेल्या दुसऱ्या निवेदनामध्ये म्हटले आहे की पाकिस्तानमध्ये राहणारे अल्पसंख्यांक हिंदूंवर सध्या अमानुष अत्याचार चालू असून हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होत आहेत हे प्रकार गेले काही वर्षापासून चालूच आहेत यंदा या प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे तेथील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गेल्या चार मासातील घटनांवरून पुन्हा एकदा ठळकपणे स्पष्ट होत आहे. ग्रामीण भागातील हिंदू मुलींपासून मोठे व्यवसायिक असलेले हिंदूंना वेचून लक्ष केले जात आहे दुर्दैव म्हणजे तेथील सरकारही या प्रकारांना अप्रत्यक्ष बळ देत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे पाकिस्तानातील हिंदूंच्या रक्षणार्थ भारत सरकारने गंभीर पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानी हिंदू वरील अत्याचाराच्या घटना मांडून पाकिस्तानवर जागतिक स्तरावर निर्बंध लादण्याविषयी किंवा कारवाई करण्याची मागणी करायला हवी जागतिक स्तरावर जेथे शक्य आहे त्या सर्व व्यासपीठांवर पाकिस्तानातील हिंदूंवरील अत्याचारांची जागृती करून पाकिस्तानला उघडे पाडायला हवे पाकिस्तानातील हिंदूंची घटती संख्या हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण पाहता भारत सरकारने पाकिस्तानला कठोर शब्दात समज द्यावी तसेच पाकिस्तानशी व्यापार दळणवळण आदींच्या संदर्भात संबंध तोडून निर्बंध लादावेत.

Back to top button
Don`t copy text!