दिरासोबत मुलीस पळून जाण्यास मदत केल्याच्या रागातून मुलीच्या नातेवाईकांकडून गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण


 

स्थैर्य, म्हसवड, दि.२९: दिरासोबत मुलीस पळून जाण्यास मदत केल्याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईकांनी( खडकी पाटोळे ता माण) येथील सत्तावीस वर्षीय विवाहित गर्भवती महिलेस विवस्त्र करून मारहाण विनयभंग केल्याची तक्रार संबंधीत महिलेने सहा जणांच्या विरोधात म्हसवड पोलिसात दिली आहे. या घटनेतील सर्व संशयित आरोपी फरारी झाले आहेत. 

तक्रारदार महिला आपल्या कुटुंबियांसह (खडकी पाटोळे तालुका माण) येथे राहते. तिचे पती पुणे येथे नोकरी करतात. शेजारी राहणाऱ्या मुलीबरोबर धीराचे प्रेम संबंध होते. यातून मुलीस या महिलेच्या दिराने पळवून नेऊन प्रेमविवाह केला आहे. याचा राग मनात धरून मुलीच्या नातेवाईक महिलांनी तक्रारदार महिलेस घरासमोर आणि नंतर भांडण मिटवण्याचे कारण सांगत गोड बोलून शेतातील नातेवाईकांशी बोलण्यासाठी घेऊन गेले. तिथे विवस्त्र करून पुरुषा समोर मारहाण केल्याची तक्रार म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही घटना दि २५ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी प्रकरणातील सर्व संशयित आरोपींमध्ये महिला व पुरुष यांचा समावेश आहे. मिनाक्षी संजय तुपे, साकरुबाई विष्णु तुपे,कल्पना आण्णा तुपे ,संतोष विष्णु तुपे, संजय श्रीरंग तुपे,आण्णा श्रीरंग तुपे (सर्व राहणार खडकी पाटोळे) यांचेविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.हे सर्व जण फरारी आहेत म्हसवड पोलीस अधिक तपास करत आहे


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!