प्रतिपंढरी करहर नगरी सुनीसुनी विठ्ठल नामाचा गजर घुमलाच नाही : देऊळबंद कडक पोलीस बंदोबस्त


दैनिक स्थैर्य । दि. २१ जुलै २०२१ । कुडाळ । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर प्रति पंढरपूर करहर येथील आषाढी एकादशीचा सोहळा रद्द झाल्याने विठ्ठल मंदिर परिसराला पोलीस छावणीचे रूप आले होते. करहर बाजारपेठ त कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे भाविक दर्शनास विठ्ठलच देऊळबंद झाल्याने विठ्ठल भक्तांना सलग दुसर्‍या वर्षी नाराज व्हावं लागलं..!

करहर, ता. जावळी येथील स्वयंभू विठ्ठलाचे स्थान असलेल्या प्रति पंढरीत प्रत्येकवर्षी विठ्ठल हरिनामाच्या गजरात गावोगावांवरून येणार्‍या पालख्यांनी हा सोहळा हजारो लोकांच्या उपस्थिती साजरा होतो. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संसर्गाने त्यावर विरजण पडले आहे.

त्यामुळे या वर्षी कडक निर्बन्ध लागू असल्याने भक्तांचा आनंदच हिरावला गेला. तर जिल्हा पोलीस आणि आर एस एस फोर्स यांनीच सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून करहर परिसरात संचारबंदी लागू झाल्यापासून ताबा घेतल्याने विठ्ठल मंदिर भविकांस बंद झाले..जागोजागी फक्त पोलीस आणि आर एस एस ची फौज हेच दृश्य नजरेस पडत होते..
या वर्षीची आषाढी एकादशी निमित्त पहाटे होणारी विठ्ठल रुक्मिणीची पूजेचा मान उपसरपंच संतोष सपकाळ व पत्नी रेखा सपकाळ, रोहिदास मोरे व दीपाली मोरे दांपत्याना मिळाला यांच्या हस्ते पूजा करण्यात आली..यावेळी पुजारी संतोष खिस्ते, मधुकर पांगारे, सरपंच भाऊ यादव, बाळू यादव, उपस्थित होते. या वेळी कोरोना नियमाचे पालन करीत विधी करण्यात आले.

उपविभागीय पोलीस अधिकारी वाई,जान्हवी खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलीस निरीक्षक अमोल माने यांच्या सूचनेनुसार करहरचे ठाणे अंमलदार डी. जी. शिंदे यांनी सुमारे 60 ते 70 पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता.

फेसबुक लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून दिल्याने लाखो विठ्ठल भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला. तर संचारबंदी असल्याने कोणीही प्रति पंढरपूर करहर मध्ये फिरकण्याचा प्रयत्न केला नाही. दरवर्षी भक्तांच्या गर्दीने न्हावून गेलेली करहर नगरी यावर्षी भाविका विना ओस पडली होती. तर शुभेच्छा बोर्डच्या गर्दीत झळकुन जाणारी नगरी यावेळी ओकी बोकी वाटत होती. तर संचारबंदी मुळे गाव निर्मनुष्य झाले होते. मोठ्या पोलीस बंदोबस्तामुळे प्रतिपंढरीला आगळे वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. स्वतः उपविभागीय पोलीस अधिकारी जान्हवी खराडे करहर मध्ये ठाण मांडून होत्या.


Back to top button
Don`t copy text!