शेतकरी कुटुंबातील प्रतिक मुळीक याची भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२४ | फलटण |
सासकल गावातील शेतकरी कुटुंबातील प्रतिक मुळीक याची नुकतीच भारतीय सैन्य दला(इंडियन आर्मी)मध्ये निवड झाली आहे. याबद्दल निरगुडी गावातील भैरवनाथ तरुण मंडळ तसेच राजधानी एक्सप्रेस न्यूजच्या वतीने प्रतिक मुळीक याचा संविधानाची प्रत व हार देऊन पत्रकार सूरज गोरे, युवक नेतृत्व निलकुमार गोरे, सामाजिक कार्यकर्ते महेंद्र गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

शेतकर्‍याचा मुलगा वयाच्या २० व्या वर्षी भारतीय सैन्य दलात भरती झाल्यामुळे प्रतिक मुळीक याच्यावर गावातून तसेच पंचक्रोशीतून अभिनंदनाचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आपल्या कुटुंबातील सदस्य भारतीय सैन्यात भरती झाल्यामुळे प्रतिकचे आई- वडील, आजी, काका, काकी, भाऊ, बहिण संपूर्ण कुटुंब आनंदाने भारावून गेले आहे.

यावेळी भैरवनाथ तरुण मंडळाचे अध्यक्ष अजित गोरे, उपाध्यक्ष आदेश गोरे, अनिल गोरे, प्रविण गोरे, आदित्य गोरे, विघ्नेश गोरे आणि मुळीक कुटुंब उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!