‘दिलखुलास’ कार्यक्रमात नगर रचना संचालक प्रतिभा भदाणे यांची दि. २०, २१ व २३ जानेवारी रोजी मुलाखत

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. २० जानेवारी २०२३ । मुंबई । माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नगर विकासच्या सहसचिव तथा संचालक, नगररचना प्रतिभा भदाणे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर शुक्रवार दि. २०, शनिवार दि. २१ व सोमवार दि. २३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल.

नगरांच्या सुनियोजनासाठी राज्यात नगर रचना हा महत्त्वपूर्ण विभाग कार्यरत आहे. नागरी क्षेत्रात प्रादेशिक विकास व नगर रचना योजना राबविण्याची जबाबदारी हा विभाग पार पाडत आहे. नागरिकांना घरकुल बांधकाम करण्यासाठी तांत्रिक मान्यता घेण्यासाठी नगररचना विभाग सातत्याने कार्यरत आहे.

या विभागाची कार्यपद्धती, प्रादेशिक व विकास योजना तसेच नगर रचना योजना, बांधकाम परवानगी आवश्यकता, जमिनीवरील विविध आरक्षणे इत्यादी बाबत सविस्तर माहिती श्रीमती भदाणे यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!