
स्थैर्य, मुंबई, दि. २३ : कोरोना व्हायरसचा प्रसार टाळण्यासाठी गेल्या चार-पाच महिन्यांपासून देशात आणि राज्यात लॉकडाऊन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमधून काही गोष्टी वगळल्या असल्या तरी राज्यातील सर्व मंदिरं अद्याप बंद आहेत.
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी पंढरपूरचं विठ्ठल मंदिर पुन्हा उघडण्यात यावं अशी मागणी केली आहे. या मागणीसाठी 31 ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना 1 लाख वारकऱ्यांसोबत मिळून मंदिर प्रवेश आंदोलन करेल, याचे नेतृत्व प्रकाश आंबेडकर करतील, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिली.
या मुद्द्यावर सोलापूरचे जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना आणि वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार असल्याच प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितलं.