दैनिक स्थैर्य | दि. 15 एप्रिल 2024 | फलटण | निश्चित पणाने माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विषय होता. त्या मतदारसंघाच्या विषयांना आज फडणवीस साहेबांना भेटण्यासाठी आम्ही नागपूरमध्ये आलेलो आहोत. साहेबांची आता जवळजवळ एक तास आमची बैठक सविस्तरपणाने झाली. त्याच्यामध्ये आमच्याकडे अडचणी होत्या; मुद्दे होते; त्याच्यावरती सविस्तर पणाने चर्चा झाली आणि त्यामध्ये सकारात्मक चांगल्या पद्धतीची चर्चा या ठिकाणी झाली आहे. आजच आम्ही काही प्रमुख नेतेमंडळी वेळापूर या ठिकाणी बसून आज संध्याकाळी ७ वाजता आमचा बैठकीमध्ये निर्णय घेऊ; असे मत सोलापूर जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांनी स्पष्ट केले.
नागपूर येथील देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर उत्तमराव जानकर बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी पाटील, जयकुमार गोरे यांची उपस्थिती होती.
याबाबत बोलताना जानकर म्हणाले कि; आज झालेल्या बैठकीतील मुद्दे आमच्या कार्यकर्त्याच्या समोर मांडून संध्याकाळी ७ वाजता बैठकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या सकारात्मक निर्णय घेतला जाणार आहे. आता तिकिटाचा विषय संपून गेला आहे. परंतु इतर ज्या काही गोष्टी घडामोडी होत्या. गेल्या दहा वर्षांमध्ये अनेक अडचणी होत्या. अनेक विषय होते आणि आमच्या बऱ्याचशा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्या ज्या ज्या अडचणी होत्या. त्या आज देवेंद्रजींच्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत. आज संध्याकाळी आम्ही बैठक घेतोय.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत झालेली बैठक अतिशय सकारात्मक झाली आहे. साहेबांनी सगळे मुद्दे आमचे जे होते तिची चर्चा चांगल्या पद्धतीने झाली आहे. हेच विषय आम्ही आमच्या कार्यकर्तेच्या समोर मांडणार आहोत. आज फडणवीस साहेबांनी इकडे बोलल्यानंतर आम्ही आलेलो आहे. या ठिकाणी अतिशय सकारात्मकाने चांगली चर्चा झाली आणि ही चर्चा आमच्या सगळ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बरोबर घेऊन आम्ही पुढील निर्णय घेणार आहे; असेही जानकर यांनी स्पष्ट केले.